भारत विकास परिषद पाचोरा शाखेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा; अध्यक्षपदी डॉ. संजय जाधव, सचिवपदी गोकुळ सोनार यांची निवड

पाचोरा – ‘समाजकार्यातून राष्ट्रनिर्माण’ हे ध्येय बाळगून कार्यरत असलेल्या भारत विकास परिषद पाचोरा शाखेच्या पुनरुज्जीवनासाठी आणि शाखेला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने रविवारी रात्री आयोजित विशेष ऑनलाइन बैठकीत वर्ष २०२६–२७ साठी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

धुळे येथील प्रांत सचिव राजेंद्र जाखडी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत डॉ. संजय जाधव यांची अध्यक्षपदी, तर गोकुळ सोनार यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे –
अध्यक्ष: डॉ. संजय जाधव
उपाध्यक्ष: डॉ. राहुल झेरवाल
सचिव: गोकुळ सोनार
महिला सहभागिता समन्वयक: सौ. पूजा तांबोळी
संस्कार समन्वयक: कमलेश सोनवणे
बैठकीला प्रांत सचिव राजेंद्र जाखडी, डॉ. पंकज हरणे, सतीश जाधव यांच्यासह विविध सदस्य उपस्थित होते. यावेळी आगामी वर्षातील सेवा, संस्कार, संपर्क व पर्यावरण या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच पाचोरा शहरात व्यापक सभासद नोंदणी अभियान राबवून परिषदेचे कार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
- याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पाचोरा शाखेला प्रांतातील आदर्श शाखा बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रप्रेमाच्या भावना व्यक्त करत राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.






