अन्यमहाराष्ट्र

भुसावळ येथे शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानची आढावा बैठक उत्साहात

विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

 

पाचोरा – भुसावळ येथे शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. महापुरुषांना वंदन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष पोपट भाऊ पताडे तसेच महाराष्ट्र राज्य उपसंपर्कप्रमुख श्रीकांत भाऊ पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजहितासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, संघटनेची उद्दिष्टे आणि आगामी काळातील कार्याची दिशा याबाबत महाराष्ट्र राज्य उपसंपर्कप्रमुख श्रीकांत भाऊ पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. संघटनेची कार्यकारिणी अधिक मजबूत करून समाजातील विविध घटकांपर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान जळगाव जिल्ह्यासह विविध तालुक्यांमध्ये महिला आघाडीच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष पोपट भाऊ पताडे आणि महाराष्ट्र राज्य उपसंपर्कप्रमुख श्रीकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

यामध्ये खानदेश विभाग अध्यक्ष महिला आघाडी वर्षाताई तलारे, जळगाव जिल्हाध्यक्ष निखिल भाऊ नेमाडे, जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मनीषाताई पाटील, जळगाव जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष भारतीताई पाटील, जिल्हा महिला सचिव मायाताई पाटील, जिल्हा महिला संघटक सुनिताताई चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख वंदनाताई, जिल्हा उपसंपर्कप्रमुख महिला आघाडी इंद्रायणी ताई भोई यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तसेच जळगाव तालुका उपाध्यक्ष सोनाली ताई लांडगे, जळगाव तालुका संपर्कप्रमुख सुषमाताई गायकवाड, पारोळा तालुका अध्यक्ष महिला आघाडी नीलिमा ताई पवार, रावेर तालुका अध्यक्ष महिला आघाडी संगीता भंगाळे, जामनेर तालुका अध्यक्ष महिला आघाडी ज्योतीताई इंगळे, जामनेर तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी छायाताई माळी, मुक्ताईनगर अध्यक्ष महिला आघाडी संगीताताई सोनवणे, मुक्ताईनगर उपाध्यक्ष महिला आघाडी पुनम ताई कोळी आणि बोदवड तालुका अध्यक्ष महिला आघाडी प्रमिलाताई पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी हवेली तालुका अध्यक्ष विक्रम भाऊ कदम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला प्राधान्य देत संघटनेचा विस्तार आणि मजबूत संघटन बांधणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

संस्थापक अध्यक्ष पोपट भाऊ पताडे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून युवक आणि महिलांना संघटित करून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या आढावा बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यात शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या संघटनात्मक बांधणीला मोठी चालना मिळाली असून विविध तालुक्यांमध्ये महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button