महाराष्ट्रराष्ट्रीय

पाचोरा-भडगाव मतदारसंघात१३ जुलै रोजी व्यापारी भवनात मत्त्वपूर्ण बैठक;वीज प्रश्नांवर एकाच व्यासपीठावर प्रशासन, महावितरण आणि लोकप्रतिनिधी;उपस्थितीचे आवाहन

पाचोरा-भडगाव मतदारसंघात१३ जुलै रोजी व्यापारी भवनात मत्त्वपूर्ण बैठक;वीज प्रश्नांवर एकाच व्यासपीठावर प्रशासन, महावितरण आणि लोकप्रतिनिधी;उपस्थितीचे आवाहन
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या, प्रलंबित तक्रारी, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाचा प्रश्न, कृषी व घरगुती ग्राहकांच्या अडचणी,स्मार्ट मीटर बाबतच्या तक्रारी तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सोमवार, दि. १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील व्यापारी भवन येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदारसंघातील वाढत्या वीजविषयक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना एकत्र आणणारी ही बैठक वीजपुरवठा व्यवस्थेतील अडचणी दूर करण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मतदारसंघातील नागरिकांच्या वीज समस्यांचे तत्काळ निवारण व्हावे, विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण व्हावा आणि प्रलंबित प्रश्नांना गती मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस आमदार किशोर आप्पा पाटील प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीस प्रांताधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती मालगावे पाचोरा कृषी अधिकारी सुधाकर कराड,भडगाव कृषी अधिकारी दीपक ठाकूर,गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, भडगाव गट विकास अधिकारी के.बी. अंजने, महावितरण कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तक्रारदार नागरिक, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
मतदारसंघातील वीजविषयक प्रश्नांचा सर्वंकष आढावा घेऊन त्यावर तातडीने निर्णय होण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून संबंधितांनी आपापल्या समस्या, सूचना व तक्रारींसह उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर अप्पा पाटील यांचे वतीने स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button