अन्यआरोग्यमहाराष्ट्र

पाचोरा तहसील कार्यालयात ‘हिरकणी कक्षा’चे थाटात उद्घाटन; स्तनदा मातांची गैरसोय टळणार!

 

पाचोरा – तहसील कार्यालय किंवा खरेदी-विक्रीच्या विविध शासकीय कामांसाठी तालुक्यातून येणाऱ्या स्तनदा माता आणि लहान बाळांच्या सोयीसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत पाचोरा तहसील कार्यालयात ‘हिरकणी कक्ष’ (स्तनपान कक्ष) उभारण्यात आला आहे. या नवनिर्मित हिरकणी कक्षाचे उद्घाटन पाचोरा तालुक्याचे आमदार आदरणीय श्री. किशोर आप्पासाहेब पाटील, पाचोरा नगरीच्या नगराध्यक्षा आदरणीय श्रीमती सुनिताताई किशोर पाटील व पाचोरा नगर परिषदेच्या सर्व महिला नगरसेविका यांच्या शुभहस्ते नुकतेच अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

या उद्घाटन प्रसंगी बोलताना ग्राम महसूल अधिकारी श्रीमती काकुस्ते यांनी उपस्थित सर्वांना हिरकणी कक्षाचे महत्त्व पटवून दिले. शासकीय कामांसाठी येणाऱ्या स्तनदा मातांना किंवा लहान बाळ असलेल्या मातांना सुरक्षित आणि हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने हा कक्ष तयार करण्यात आला असून, यामुळे मातांची होणारी गैरसोय पूर्णपणे टळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी श्री. भूषणजी अहिरे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेबजी पाटील, पाचोरा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर व सर्व नगरसेवक, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, महसूल नायब तहसीलदार प्रमोद मोरे, संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार प्रतिभा राजपूत आणि पुरवठा नायब तहसीलदार सुषमा उरकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच तालुक्यातील सर्व महिला ग्राम महसूल अधिकारी, सर्व महिला महसूल सेवक कर्मचारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा सांगता सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला असून, शेवटी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती काकुस्ते यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. शासकीय आवारात मातांसाठी सुरू झालेल्या या संवेदनशील सुविधेबद्दल पाचोरा तालुक्यातून कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button