अन्यमनोरंजनमहाराष्ट्रराष्ट्रीयशैक्षणिक
Trending

निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात संपन्न

  • पाचोरा (प्रतिनिधी): निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद, उत्साह आणि कलात्मकतेचा संगम पाहायला मिळाला. शाळेचे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखात आणि सांस्कृतिक सोहळ्याच्या वातावरणात पार पडले.

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, निर्मल सीड्स संचालक डॉ. सुरेश पाटील, जे. सी. राजपूत, डॉ. डी. आर. देशमुख, निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक श्री. सुरेश पाटील तसेच पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. दीपप्रज्वलनानंतर गणेश वंदनाच्या मंगल सुरांनी वातावरण अधिक पवित्र आणि भक्तिमय झाले. “ज्ञानाच्या ज्योतीतून संस्कारांचा प्रकाश पसरविणाऱ्या या दीपोत्सवाने” स्नेहसंमेलनाचा शुभारंभ झाला.

दरवर्षी विद्यार्थ्यांना नृत्याविष्कारासाठी वेगवेगळे विषय दिले जातात. यंदाही विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थित पालक आणि प्रेक्षक यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणात सर्जनशीलतेचा, ताल-लयबद्धतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच वेगवेगळ्या भाषांमध्ये सूत्रसंचालन करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि वाणीतील गोडीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.या प्रसंगी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमातील नृत्याविष्कार व सूत्रसंचालनाचे मूल्यमापन करण्यासाठी बाह्य परीक्षक म्हणून सौ. किरण रायकवार, सौ. शितल पटवारी, प्रा. सौ. सुनीता गुंजाळ, आणि प्रा. श्री. पी. आर. पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सुंदर मूल्यमापन केले.

या वेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. कमलताई पाटील, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील तसेच मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी एकदिलाने अथक परिश्रम घेतले.

या स्नेहसंमेलनाने “निर्मल परिवाराची एकजूट आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा झगमगता दीप” सर्वांसमोर उजळवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button